टोपीवाला हायस्कुल ची स्थापना १० एप्रिल १९११ रोजी झाली. शिक्षणाच्या अपु-या सोयी सुविधा लक्षात घेऊन  मालवण मध्ये एक नविन हायस्कुल काढण्याचा संकल्प स्व. श्री. बाबासाहेब वराड्कर, स्व. श्री. बापुसाहेब देसाई, स्व. श्री. क्रुष्णराव देसाई, स्व. श्री. विनायक आजगावकर, स्व. डॉ. राजाराम आजगावकर यांनी आखला. भाऊसाहेब टोपीवाले यांनी शाळेसाठी दहा हजार रुपये देणगी दिली. या देणगी मुळे शाळेची सुरुवात झाली. जागेअभावी मालवण बंदरावरील लाडोबांच्या वखारीत शाळा भरु लागली. त्यानंतर झांट्ये, कामत, शेठ विठ्ठ्ल दास यांच्या वखारी भाड्याने घेउन शाळेचे वर्ग त्या काळात चालले. शाळेसमोरच्या अड्चणी व गरजा लक्षात घेऊन भाऊसाहेब टोपीवाले यांनी सव्वा लाखाची देणगी देऊन शाळेची इमारत उभी केली व शाळेच्या इतर खर्चाकरीता पंच्याह्त्तर हजार रुपये दिले. शाळा, मैदान, वसतीग्रुह यासाठी पंधरा एकर जागा उपलब्ध करुन दिली.

१९१२ मध्ये शाळा सरकार मान्य झाली व १९१३ मध्ये तिला शासकिय अनुदानही  मिळाले. १९१५ पर्यंत भाऊसाहेब टोपीवाले स्वत: शाळेचा कारभार चालवत. त्यानंतर स्वतंत्र सोसायटीची स्थापना करुन भाऊसाहेब टोपीवाले यांनी आपल्याकडील सर्व कारभार सोसायटीकडे सोपविला. इ.स. १९११-१२ व १९२८-२९ या कालावधीसाठी स्व. गुरुवर्य बाबासाहेब वराड्कर हे शाळेचे मुख्याध्यापक बनले. त्यांच्या निग्रही व धडाडी व्रुत्तीमुळे शाळेस प्रगतीची दिशा मिळाली. पुढे वाचा >>

history